विहिरीसाठी 4 लाखाचं अनुदान कस मिळवायच ? जाणून घ्या. नमस्कार शेतकरी बांधवानो विहिरीसाठी 4 लाख रूपये अनुदान हवय ! मग तुम्ही अगदी योग्य जागी माहिती घेण्यासाठी पोहचला आहात याची मी खात्री देतो. कारण आजच्या ब्लॉग मधून आपण जाणून घेणार आहोत की विहिरी साठी मिळणार 4 लाख रूपये एवढ अनुदान तुम्ही कस मिळवू शकणार आहात. राज्य सरकार च्या भरपूर अश्या योजना आहेत. ज्या शेतकऱ्यासाठी लाभ कारक ठरू शकतात. पंरतू माहितीच्या अभावामुळे आपण त्याच्यापासून वंचित राहतो.
सध्या उन्हाळा सुरू होण्याची चाहूल सुरू झाली आहे. शेतकरी राजाला हाच फक्त ऋतू आहे ज्यामध्ये शेतकरी बांधव आपल्या विहिरी खणू शकतात किवा त्याची डागडूज करू शकतात. कारण पावसाळयात विहिरी खोदकामास भरपूर अडचणी असतात. सर्वात मोठी अडचण म्हणजे पावसाच्या पाण्याची आणि चिखलाची त्यामुळे विहिरीची कामे शक्यतो उन्हाळयात करतात.
विहिरीसाठी 4 लाखाचं अनुदान कस मिळवायच ? जाणून घ्या.
विहिर खोदण्यासाठी अनुदान या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच (मनरेगा) च्या माध्यमातून सिचंन विहिरी खोदण्यासाठी शेतकरी बांधवाना 4 लाख रूपये एवढं अनुदान दिल जाणार आहे.
यासंबंधीचा शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विहिर खोदण्यासाठी अनुदान मिळवायच असेल कश्या प्रकारे अर्ज करावा लागेल ? कुठे अर्ज करावा लागेल ? त्यासाठी काय पात्रता आहे ? या बाबतीतील सविस्तर माहिती आपण पाहूया.
अर्ज कोण करू शकतो ?
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जाती
- विमुक्त जाती
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- स्त्री- कर्ता असलेली कुटुंबे
- विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- इंदिरा आवाज योजनेचे लाभार्थी
- सीमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी)
- अल्प भूधारक शेतकरी(5 एकर पर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी)
अनुदान मिळवण्यासाठी पात्रता काय आहे?
- अनुदान मिळवण्यासाठी अर्जदारकडे किमान 1 एकर शेतजमीन सलग असावी
- पिण्याच्या पाणाच्या विहिरीपासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहिर खोदता येईल
- दोन विहिरीमध्ये 150 मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंबासाठी लागू नाही. आणि खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
- लाभधारकाच्या सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये.
- 8-अ उतारा आवश्यक आहे.
- एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील, त्यासाठी एकूण जमिनीचे सलग क्षेत्र 1 एकरापेक्षा जास्त असावे.
- अर्जदार हा मनरेगा जॉब कार्डधारक असावा.
हे पण वाचा: “पोशीर धरण प्रकल्प: कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा संघर्ष आणि भविष्य”
अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कुठे ? व कसा करावा ?
अनुदान मिळवण्यासाठी मनरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी अर्ज सध्यातरी ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर शेतकरी बांधव ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबाबतचा संपूर्ण शासन निर्णय या ब्लॉगच्या खाली आपणास उपलब्ध करून दिला आहे.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी लागतील ?
अर्ज पूर्ण लिहून झाला की त्यासोबत तुम्हाला पुढील कागदपत्रे जोडवी लागतील
- सातबारा
- 8 अ चा उतार
- मनरेगा जॉब कार्ड
- सामुदायिक विहिर खोदयची असल्यास 1 एकर जमीन सलग असल्याचे करार पत्र
अर्ज आणि त्यासोबत वरील कागदपत्र अर्जदाराने ग्रामपंचायत कार्यालयात भरून जमा करावयाची आहेत.तुम्ही दिलेला अर्ज ऑनलाईन माध्यमातून भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायत कार्यालयाची असेल, तसेच अर्ज सादर केल्यानंतर संबंधित शेतकरी बांधवाला एक पोच पावती सुध्दा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल.
- रोजगार हमी योजना सिंचन विहिर अर्ज pdf 2025?
या योजनेच्या माध्यमातून विहिर खोदण्यासाठीचा अर्जायासाठी येथे क्लिक करा.
- दोन विहिरीमधील अंतर किती असावे?
दोन विहिरीमधील अंतर 150 मीटर इतके असावे
- विहिरीसाठी अनुदान किती मिळते?
विहिरीसाठी अनुदान जवळपास 4 लाख रूपये एवढे अनुदान मिळते
अधिक माहितसाठी हे वाचा: येथे क्लिक करा
1 thought on “विहिरीसाठी 4 लाखाचं अनुदान कस मिळवायच ? जाणून घ्या.”