सारथी संस्थेमार्फत मराठा तरूणांना मिळणार मोफत लाईसन्स नमस्कार मित्रानो किसान विचारमंच या आपल्या ब्लॉगमध्ये तुमच स्वागत आहे. सरदार सुर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा – कुणबी या सारथीच्या लक्षित गटाच्या 20 ते 45 या वयोगटातील जवळपास 1500 तरूणांना 30 दिवसाचे नि:शुल्क लाईट मोअर व्हेईकल(LMV) व हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल (HMV) लाइसन्स काढून मिळणार आहे.
सारथी संस्थेमार्फत मराठा तरूणांना मिळणार मोफत लाईसन्स:
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील स्थापन करण्यात आलेली एक संस्था आहे. दिनांक 10.01.2025 रोजी सारथी या संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा – कुणबी मधील 20 ते 45 वयोगटातील तरूणांना वाहन चालक प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर कौशल्य विकास प्रशिक्षण करिता लक्षित गटातील पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच सदर प्रशिक्षणार्थी उमेदवारांना 10,000 रू एवढे विद्यावेतन देण्यात येणार आहे.
अधिक वाचा : छत्रपती श्री उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या हयातीत त्यांच्या सरंजाम जमिनींना सूट
या प्रशिक्षण कार्यक्रमाची संधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत असलेल्या आय डी टी आर पुणे या केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता ऑनलाईन अर्ज दिनांक 10 जानेवारी 2025 पासून सारथी संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन करावी लागेल सारथी संस्था वेबसाईइ- https://sarthi-maharashtragov.in/announcement/motordrivingtraing
1 thought on “सारथी संस्थेमार्फत मराठा तरूणांना मिळणार मोफत लाईसन्स”