संजय गांधी निराधार योजना

नमस्कार शेतकरी बांधवांनो किसान विचार मंच या आपल्या हक्काच्या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे आज आपण संजय गांधी निराधार योजना बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत ही योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाते ही योजना लागू करण्यापाठीमागचा शासनाचा उद्देश तसेच या योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व कोणत्या लाभार्थी गटाला याचा फायदा मिळणार आहे अशी सर्व माहिती आपण पाहणार आहोत.

संजय गांधी निराधार योजना:

संजय गांधी निराधार योजना लागू करण्यापाठीमागचा शासनाचा उद्देश:

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा उद्देश हा समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करणे हा आहे.

 संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी:

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी हे विधवा महिला, दिव्यांग,  दुर्धर आजारग्रस्त,  अनाथ,  परितक्त्या,  देवदासी,  अत्याचारित महिला,  वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला,  तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नी,  35 वर्षावरील निराधार महिला,  इत्यादी दुर्बल निराधार घटक

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे:

या योजनेस आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांचा तपशील पुढील प्रमाणे

  1.  विहित नमुन्यातील अर्ज
  2.  वयाचा दाखला किमान 18 ते 65 वर्ष वयोगट (18 वर्षापेक्षा कमी पालकांमार्फत लाभ)
  3. किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
  4. विधवा महिला अर्जदारांकरीता पतीचा मृत्यूचा दाखला
  5. दिव्यांग व जिल्हा शल्यचिकित्सक दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक (किमान 40%)
  6.  अनाथ दाखला
  7. दुर्धर आजार प्रमाणपत्र
  8. उत्पन्नाचा दाखला
  9. दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा  50,000 रुपये
  10. इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 21000
  11. आधार कार्ड
  12. रेशन कार्ड
  13. निवडणूक ओळखपत्र
  14. बँक पासबुक झेरॉक्स
  15.  रहिवासी दाखला
  16. अर्जदाराचा फोटो इत्यादी
  17. अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500  रुपये लाभ

 अधिक वाचा : नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारे दिली ही भेट , दिले हे नवीन पॅकेज 

संजय गांधी निराधार योजना फॉर्म ऑनलाईन:

सदर योजनेच्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र येथे जाऊन या योजनेचा फॉर्म भरू शकता.

संजय गांधी निराधार योजना ऑफिसिअल वेबसाइट:

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate_Documents?ServiceId=2236

1 thought on “संजय गांधी निराधार योजना”

Leave a Comment