PM-Kisan: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता येणार या दिवशी

 PM-Kisan: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता येणार या दिवशी PM-Kisan: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी पर्यंत येणार याबाबत सध्या माध्यमामध्ये वेगवेगळया चर्चा चालू आहेत. परंतू या आगोदर PM-Kissan योजनेअंतर्गत याआगोदर जे 18 हप्ते शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत त्याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो किसान विचारमंच या आपल्या ब्लॉगमध्ये तुमच स्वागत आहे.

PM-Kisan: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता येणार या दिवशी
PM-Kisan: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता येणार या दिवशी

PM-Kisan: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता येणार या दिवशी:

PM-Kissan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पहिला हप्ता डिसेंबर 2018 रोजी प्राप्त झाला. ज्यामध्ये जवळपास 3,16,19,876 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. यासाठी जवळपास केंद्र सरकारने 6,323.98 करोड रूपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. त्यानंतर दुसरा हप्ता एप्रिल 2019 मध्ये जवळपास 6,00,34,451 एवढ्या शेतकऱ्यांना हप्ता प्राप्त झाला.

PM Kissan Samman Nidhi म्हणजेच पीएम किसान असे आपण ज्याला म्हणतो त्याचा 19 वा हप्ता येणार आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांना तसेच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत. या योजनेतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकार मार्फत 2000 रूपये जमा केले जाणार आहेत. स्वत: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करणार आहेत.  सध्यातरी 19 हप्ता कधी येणार याची तारीख केंद्राने जाहीर केली नसली तरी लवकरच याची अधिकारीक घोषणा केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर केली जाईल पंरतू वेगवेगळया माध्यमामधून जी माहीती समोर येतेय त्याअनुषंगाने हा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याबाबत आपण पुढे जाणून घेणार आहोत.

PM Kissan Samman Nidhi (PM Kissan) योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार हे तर आपण जाणून घेणारच आहोत पंरतू त्याआगोदर आपण पहिला हप्ता, दुसरा हप्ता,तिसरा हप्ता कधी प्राप्त झाला ते माहिती करून घेऊया. PM Kissan Samman Nidhi (PM Kissan) योजनेचा पहिला हप्ता डिसेंबर 2018 ला दुसरा हप्ता एप्रिल 2019 ला तिसरा हप्ता ऑगस्ट 2019 ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

PM Kissan Scheme 19 वा हप्ता कधी प्राप्त होणार बाबत थोड जाणून घेऊया :

पीएम किसान योजनेचा 19 हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये शेतकऱ्यांना प्राप्त होईल अशी वेगवेगळया माध्यमातून माहिती मिळत आहे.पंरतू अद्यापर्यंत याची काणतीही तारीख फायनल झाली नाही. प्रत्येक लाभार्थाच्या बँक खात्यात तीन हप्त्यात प्राप्त होणाऱ्या 6000 पैकी 2000 हजार रूपये प्राप्त होतील.

अधिक वाचा : सारथी संस्थेमार्फत मराठा तरूणांना मिळणार मोफत लाईसन्स

पीएम किसान 19 वा हप्त्याबाबत थोडक्यात माहिती:

  • या योजनेतर्गत जवळपास 9.5 करोड लोक नोंदणीकृत आहेत.
  • हा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये शेतकऱ्यांना प्राप्त होईल अशी माहिती आहे.
  • प्रत्येक लाभार्थाच्या बँक खात्यात 2000 रूपये मिळणार
  • केंद्र सरकारने या योजनेकरिता जवळपास 20,000 कोटी रूपयाची रक्कम ठरविली आहे.

PM Kissan योजनेचे महत्व:

PM Kissan योजनेचे उदिष्ठ हे छोटे व सीमांत शेतकऱ्यांना वित्तीय स्थैय प्राप्त करून देणे हे आहे. ज्यामुळे शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढेल आणि त्यांचे जीवन सुरक्षित करण्यास मदत होईल फेब्रुवारी 2019 पासून या योजनेच्या शुभांरभ झाल्यापासून ही  योजना शेतकऱ्यांना मदत करत आहे.

PM Kissan योजनेचे status कसे चेक करावे:

  • https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • त्यानंतर फार्मर्स कॉर्नर या सेक्शन वर क्लिक करा
  • आपले स्टेटस जाणून घ्या यावर क्लिक करा
  • तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका व कोड टाका
  • ‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा आणि तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरील ओटीपी टाका
  • त्यानंतर तुम्हाला प्राप्त झालेल सर्व हप्त्याची माहिती प्राप्त होईल

PM Kissan योजनेच्या काही महत्वपूर्ण तारखा:

  • योजना सुरू झाल्याचा दिनांक :फेब्रुवारी 2019
  • 19 वा हप्ता मिळण्याची संभाव्य तारीख : फेब्रुवारी 2025
  • eKYC करण्याचा कालावधी : चालू आहे
  • 20 वा हप्ता मिळण्याची संभाव्य तारीख : जून 2025 पर्यंत

सर्व शेतकरी बांधव हा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहेत, त्याअनुषंगाने सर्व बांधवानी PM Kissan वेबसाईट ला भेट देत रहा…

1 thought on “PM-Kisan: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता येणार या दिवशी”

Leave a Comment