pm internship scheme: प्रधानमंत्री ईटर्नशिप योजना काय आहे? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.नमस्कार मित्रांनो किसान विचारमंच या आपल्या ब्लॉगवर तुमच स्वागत आहे. pm internship scheme ही योजना केंद्र सरकार मार्फत राबलिली आहे. या अतर्गंत भारतातील तरूणांना भारतातील सर्वात मोठ्या 500 कंपन्यामध्ये ईटर्नशिप करण्याची संधी प्रदान करते. ही योजना युवकांना वेगवेगळया क्षेत्रातील वास्तविक जीवनातील व्यावहारीक वातावरणाशी परिचित होण्याचे प्रोत्साहन देते. ज्यामुळे त्यांना कौशल्य आणि कामाचा अनुभव प्राप्त करण्यास मदत होते.या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षात 1 कोटी तरूणांना ईटर्नशिप प्रदान करण्याचे लक्ष्य आहे.
pm internship scheme
आता सर्वात महत्वाचे pm internship scheme मध्ये भाग घेऊन तरूणांनी ही इंटर्नशिप का करावी? तर या ईटंर्नशिपमधील उमेदवार आणि कंपन्या यांच्यामध्ये एक व्यवस्था आहे.ज्यामध्ये कंपन्या ईटर्न ना व्यवसाय संगठन आणि वास्तविक जीवनातील जे वातावरण त्यामध्ये प्रशिक्षण देते अनुभव देते .
pm internship scheme :पंतप्रधान इंटर्नशिप योजनेद्वारे मला कोणत्या प्रकारची इंटर्नशिप मिळू शकते?
पात्र उमेदवारांना आयटी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बँकिंग आणि वित्तीय सेवा, तेल,गॅस आणि ऊर्जा, धातू आणि खाणकाम, FMCG (फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स), दूरसंचार,पायाभूत सुविधा आणि बांधकाम, किरकोळ आणि ग्राहक टिकाऊ वस्तू, सिमेंट आणि बांधकाम साहित्य, ऑटोमोटिव्ह, फार्मास्युटिकल, विमानचालन आणि संरक्षण, उत्पादन आणि औद्योगिक, रसायने, मीडिया, मनोरंजन आणि शिक्षण, कृषी आणि संबंधित, सल्लागार सेवा, कापड उत्पादन,रत्ने आणि दागिने, प्रवास आणि आदरातिथ्य आणि आरोग्यसेवा यासह विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळते
हे पण वाचा: अजित पवारांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध?
pm internship scheme च्या माध्यमातून कोणत्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते?
pm internship scheme च्या माध्यमातून तुम्हाला भारतातील सर्वात मोठ्या 500 कंपन्यामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. यातून तुम्हाला या कंपनीमध्ये काम केल्याचे प्रमाणपत्रासह अनुभव प्रमाणपत्र सुध्दा मिळणार आहे.
pm internship scheme चा कालावधी ?
pm internship scheme चा कालावधी हा 12 महिन्याकरिता असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना विविध कंपन्यामध्ये 12 महिने काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
pm internship scheme अंतर्गत प्रशिक्षण केल्यानंतर नोकरी मिळेल का?
pm internship scheme अंतर्गत पात्र उमेदवार जे प्रशिक्षण पूर्ण करतील त्यांना या माध्यमातून भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यासोबत काम करण्याची संधी प्राप्त होते. पंरतू या योजने अंतर्गत काम केल्यानंतर कोणत्याही स्वरूपाची नोकरी प्राप्त होत नाही पंरतू नोकरी मिळण्यासाठीचे कौशल्या मात्र प्राप्त होते. तसेच नोकरी मिळण्याची शक्यतामध्ये वाढ नक्कीच होते.
pm internship scheme : योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराची पात्रता
- तो भारताचा नागरिक असावा
- उमेदवाराचे 21 ते 24 वर्ष वय असावे
- उमेदवार हा 10 वी किंवा 12 पास असावा.