‘लाडक्या बहिणीं ‘ना मुख्यमंत्र्यांचा शब्द ‘लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे,’ असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगताच ‘ही योजना कधीही बंद करणार नाही !’ अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिली.
‘लाडक्या बहिणीं ‘ना मुख्यमंत्र्यांचा शब्द
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या २० महिलांची आणि फडणवीस यांची रसिकाश्रय या संस्थेने ‘जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी’ या उपक्रमांतर्गत सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी भेट घडवली. या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ‘भांडी घासून मिळणाऱ्या ५०० रुपयांत कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न होता.
लाडकी बहीण योजनेचा मोठा आधार
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे आम्हाला मोठा आधार मिळाला,’ असे म्हणताना एका वृद्ध महिलेचा गळा दाटून आला. फडणवीस यांनी त्यांच्या भावना समजून घेत ‘लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचा विचार करतोय,’ असे आश्वासन दिले. ‘आम्ही कधी विमान पाहिले नव्हते; पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला,’ असे एका महिलेने त्यांना आवर्जून सांगितले.
हे पण वाचा: मार्चपर्यंत २५ लाख ‘लखपती दीदी’ तयार होतील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा
आवर्जून सांगितले.
‘सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत,’ अशी विनंतीही महिलांनी फडणवीस यांना केली, तेव्हांही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘शासन पातळीवर या मागणीचा विचार करू,’ असे उत्तर दिले. ज्या वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नाहीत, त्यांना ‘निराधार योजने’ अंतर्गत मदत देण्याचेही फडणवीस यांनी कबूल केले.
हे पण वाचा: Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांकडून मोठा दिलासा, योजेबाबत मोठी अपडेट