छत्रपती श्री उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या हयातीत त्यांच्या सरंजाम जमिनींना सूट नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती उदयन महाजन भोसले यांच्या सरंजाम जमिनीना शासनाने दिनांक 09.01.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करून सूट दिली याबाबबत आज आपण आपल्या या blog मधून जाणून घेणार आहोत.
छत्रपती श्री उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या हयातीत त्यांच्या सरंजाम जमिनींना सूट
छत्रपती श्री उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या हयातीत त्यांच्या सरंजाम जमिनींना The Bombay Sarnjams,jahagirs and other Inams of Political Nature, Resumption Rules, 1952 या कायद्यातर्गत सूट देण्यात आली होती. ही सूट त्यांच्या हयाति नंतर त्यांच्या वारसाना तहयात सुरु ठेवण्याची विंनती महाराजांनी 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांना कली होती. त्या अनुषंगाने The Bombay Sarnjams, Jahagirs and other Inams of Political Nature, Resumption Rules, 1952 या कायद्याच्या rule no 1 आणि 2 जे की अधिनियम क्र. 11/1852 मधील अनुसूची ब मधील नियम 10 आणि मुंबई कायदा मधील कलम 2 अन्वये प्राप्त अधिकाराने त्यांच्या वारसाना तह्यात सूट दिली आहे.
अधिक वाचा : संजय गांधी निराधार योजना बद्दल संपूर्ण माहिती
1980 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी त्यांचे अधिकार वापरून अशी सूट छत्रपती उदयन महाराज भोसले यांना दिली होती. आज हीच सूट त्यांच्या वारसाना तह्यात या शासन निर्णयाने देण्यात आली आहे. 1980 च्या शासन निर्णया अन्वये सरंजामदार म्हणून श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांचे नाव महसूल अभिलेखी सरंजामदार म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे व रेघेखाली जमीन वहीती करण्याऱ्यांची नावे नोंदवण्यात आली आहेत.या पार्श्वभूमीवर हीच सूट त्यांच्या वारसाना तह्यात देण्याबाबतची बाब शासनाच्या विचारधीन होती.त्याअनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील अनन्य साधारण महत्व विचारात घेवून व श्रीमंत भोसले कुटुंबीयांची उपजीविका त्यांच्या दर्जानुसार व्हावी, यासाठी सदर घराण्याच्या खाजगी जमिनी व इतर मालमत्ता यांना The Bombay Saranjams, Jahagirs and other Inams of Political Nature, Resumption Rules, 1952 मधनू वेळोवेळी संदर्भीय नमूद शासन निर्णयान्वये सुट देण्यात आलेली आहे. सदरची सुट श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले, यांचे हयातीनंतर वंशपरंपरेने त्यांच्या लिनियल वारसांना (Lineal Heirs) तहहयात चालु ठेवण्यास या शासन निर्णयाद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे
1 thought on “छत्रपती श्री उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या हयातीत त्यांच्या सरंजाम जमिनींना सूट”