आजचा टोमॅटो बाजारभाव: नमस्कार शेतकरी बांधवानो किसान विचारमंच या वेबसाईटवर तुमच स्वागत आहे. या लेखात आपण पाहणार आहोत कोणत्या कृषी पिकामध्ये सध्या मार्केटमध्ये आहे चढ- उतार विशेष करून टोमॅटो या पिकाबाबत आपण जाणून घेणार आहोत.
आजचा टोमॅटो बाजारभाव:

नमस्कार शेतकरी बांधवानो आज मंगळवार दि.20.05.2025 रोजी तस पाहयला गेल तर देशाततील वेगवेगळया कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजचा टोमॅटो बाजारभावत चढ-उतार पहायला मिळाली पण विशेष करून सुरत आणि फैजाबाद बाजारपेढेत टोमॅटो बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो बाजारभाव कमी झाल्याचे निर्दशनास आले. तसच देशातील इतर काही बाजार समित्यामध्ये टोमॅटो बाजारभाव मध्ये स्थिरता सुध्दा पहायला मिळाली.
टोमॅटो बाजारभाव सविस्तर माहिती:
ॲगमार्कच्या माहितीनुसार देशातील सुरत बाजारपेठेत आजचा टोमॅटो बाजारभाव मध्ये वाढ झाल्याचे निर्दशनास आल्याचे सांगितले. 19 मे 2025 रोजी सूरत बाजार पेढेत टोमॅटो बाजारभाव 1300 रू इतका होता. तर, 20 मे रोजी 450 रूपयांची वाढ झाल्याचे निर्दशनास आल्याचे दिसून येते. मंगवारी सुरत मध्ये टोमॅटो बाजारभाव 1750 रू इतका झाला आहे.
महाराष्ट्रातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजचा टोमॅटो बाजारभाव काही अंशी खाल उतरल्याचे दिसून येते. 19 मे, 2025 रोजी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो बाजारभाव 1300 रूपये असल्याचे पहायला मिळाले. तर 20 मे रोजी टोमॅटो बाजारभाव 100 रूपयांनी घसरून 1200 रूपये झाल्याचे पहायला मिळाले.
राजस्थान मधील जोधपूर बाजार पेठेत आजचा टोमॅटो बाजारभाव स्थिर असल्याचे पहायला मिळाले. 19 मे, 2025 रोजी 1500 रूपये इतका असणारा बाजारभाव 20 मे रोजी 1500 रूपये असल्याचे पहायला मिळाले अश्या रितीने काही भागात आजचा टोमॅटो बाजारभाव चढता दिसला तर काही भागात उतरता झाल्याचे पहायला मिळते तर काही भागात बाजारभाव स्थिर राहिल्याचे पहायला मिळाले.
हे पण वाचा: 📰 अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान: सरकारची मदतीची हमी.
देशातील टोमॅटो शेतीची उत्पादन (टोमॅटो बाजारभाव)

देशातील टोमॅटो शेतीचे उत्पादन पहायला गेल तर असे दिसून येते की, भारतातील 7 राज्ये अशी आहेत जिथे टोमॅटोची शेती सर्वात जास्त केली जाते. व टोमॅटोचे उत्पादन सुध्दा सर्वात जास्त या राज्यात होत असल्याचे निर्दशनास येते. ही सात राज्य देशीतील जवळपास 75 टक्के टोमॅटोचे उत्पादन घेत असल्याचे पहायला मिळते.
आंध्रप्रदेशात देशातील सर्वात जास्त टोमॅटोचे उत्पादन होत असल्याचे पहायला मिळते, आंध्रप्रदेशात देशातील एकूण उत्पादनापैकी 17 टक्के टोमॅटो उत्पादन होते. यानंतर कर्नाटक, मध्यप्रदेश, तमिळनाडू, ओडिशा, गुजरात, पश्चिम बंगाल आहे.
देशातर्गंत टोमॅटो उत्पादनातील वाढ: (टोमॅटो बाजारभाव)
कृषी मंत्रालयाच्या अलीकडील आकडेवारी वरून स्पष्ट होते की, देशातर्गंत टोमॅटो उत्पादनात यावर्षी वाढ झाल्याचे पहायला मिळते. 2022-23 या वर्षात देशातर्गंत टोमॅटो उत्पादन हे 204.25 लाख टन झाल्याचे पहायला मिळते. तर 2023-24 या वर्षात 213.20 लाख टन उत्पादन होईल असा अनुमान आहे. त्यामुळे यावर्षी टोमॅटो उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येणाऱ्या काळात टोमॅटो बाजारभाव कसा असेल: (टोमॅटो बाजारभाव)
कमोडिटी क्षेत्रातील काही अभ्यासक या विषयी असे सांगतात की, काही दिसापासून आपण पाहतोय की आजचा टोमॅटो बाजारभाव मध्ये वाढ झाल्याचे दिसून येते, याच सर्वात मोठे कारण की टोमॅटोची मागणी वाढत आहे. पंरतू टोमॅटोचा तेवढ्या प्रमाणात पुरवठा होताना दिसत नाही. त्यामुळे टोमॅटोच्या बाजारभावाला स्थिरता आल्याचे दिसून येते. तसेच थोडया कमी कालावधीत टोमॅटो बाजारभाव वाढल्याचे सुध्दा दिसून येते. तसेच देशातील सध्याची वातावरणाची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात सुध्दा बाजारात टोमॅटोची आवक तेवढया प्रमाणात वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे थोड्या फार दिवसा करिता का होईना पण आजचा टोमॅटो बाजारभाव वाढण्याची चिन्हे दिसत आहे.
टोमॅटो शेतकऱ्यांना सल्ला:
शेतकऱ्यांनी वरील परिस्थिती पाहता आपल्याकडील असलेल्या टोमॅटोचा साठा वाढवला पाहिजे जेणे करून बाजारभावात वाढ झाल्यास त्या साठयाची आवक बाजारात करायला हवी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाजारभाव मिळेल अशी अपेक्षा आहे.
अधिक माहितीसाठी : येथे क्लिक करा