नमो शेतकरी हप्ता: ₹2,000 रुपये आले का, तपासा मोबाईलवर
नमो शेतकरी हप्ता: ₹2,000 रुपये आले का, तपासा मोबाईलवर
राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम ₹2,169 कोटी थेट लाभार्थ्यांच्या (DBT) बँक खात्यात 31 मार्च 2025 पर्यंत जमा केली जाईल. यामुळे महाराष्ट्रातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पीएम-किसान योजना: शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा आधार
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना सुरू केली होती. या योजनेत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ₹6,000 दिले जातात, जे तीन समान हप्त्यांमध्ये ₹2,000 च्या प्रमाणात दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक केलेल्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.
हे पण वाचा: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा: भोगवटादार वर्ग 2 जमीनींवर तारण कर्ज मिळणार
मोबाईलवर हप्ता कसा तपासायचा:
शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांचा हप्ता जमा झाला आहे का, हे तपासण्यासाठी खालील पद्धत वापरावी:
- लिंक ओपन करा: https://nsmny.mahait.org/ ही लिंक ओपन करा.
- “Beneficiary Status” बटणावर क्लिक करा: वेबसाइटवर लाल रंगाच्या “Beneficiary Status” (लाभार्थी स्थिती) बटनावर क्लिक करा.
- आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका: तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
- कॅप्चा कोड भरा: स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड योग्य प्रकारे भरा.
- OTP टाका: तुमच्या मोबाईलवर 6 अंकी OTP येईल. तो OTP टाका.
- डेटा तपासा: “Get Data” (गेट डेटा) बटणावर क्लिक करा. तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती स्क्रीनवर दिसेल. यात हप्ता कोणत्या तारखेला, कोणत्या बँकेत जमा झाला आहे, हे स्पष्टपणे पाहता येईल.
सरकारचे शेतकऱ्यांना आर्थिक मदत:
या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे, ज्यामुळे त्यांना शेतीसाठी स्थिर उत्पन्नाचा आधार मिळतो. सरकारने वेळेवर हप्ते जमा करण्याची व्यवस्था केली आहे, त्यामुळे कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही. जर तुमचा हप्ता जमा झाला नसेल, तर त्वरित संबंधित बँक किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
ही डिजिटल प्रणाली पारदर्शक आहे आणि भ्रष्टाचार व गैरव्यवहार टाळण्यास मदत करते. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात हप्ता मिळण्याची खात्री सरकारने दिली आहे.
अधिक माहितीसाठी येथे: क्लिक करा