राज्यात येणार नवीन वाळू धोरण: New Sand Policy In Maharashtra
राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी राज्यात नवीन वाळू धोरण येणार असल्याचे माहिती राज्याच्या विधिमंडळात दिली. आता नवीन धोरणानुसार प्रत्येक वाळू डेपोवर घरकुल वाळूसाठी झिरो रॉयल्टी आरक्षण दिलं जाणार आहे, असं राज्याचे महसूल मंत्री बावणकुळे यांनी जाहीर केलं. याचा फायदा आता घरकुल लाभार्थाना होणार आहे. असा विश्वास मंत्री महोदयांनी व्यक्त केला.
नमस्कार शेतकरी बांधवानो किसान विचारमंच च्या आजच्या लेखा मध्ये राज्यात येऊ घातलेल्या नवीन वाळू धोरणा विषयी जाणून घेणार आहोत.
राज्यात नवीन वाळू धोरण पुढच्या आठवड्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे राज्यातील वाळू माफिया कमी होतील. तसेच त्यांच्यावर नियत्रंण सुध्दा येईल . या नवीन वाळू धोरणानुसार राज्यातील घरकुल योजनेतील लाभार्थाना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधीमंडळात दिली आहे.
हे पण वाचा: विहिरीसाठी 4 लाखाचं अनुदान कस मिळवायच ? जाणून घ्या.
- नवीन धोरणानुसार प्रत्येक डेपोवर घरकुल वाळूसाठी झिरो रॉयल्टी आरक्षण दिल जाणार आहे. त्यामुळे राज्यातील घरकुल लाभार्थाना त्याचा फायदा होईल, असा विश्वास मा.मंत्री महोदयानी व्यक्त केला.
- राज्यात वाळूसह एम सॅन्ड धोरण आणल जाणार आहे. दगडापासून वाळू तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाळू माफिया कमी होतील, तसेच हे नवीन धोरण अर्थ विभागाकडे पाठविण्यात आले आहे. जेणे करून एक आठवडयात हे वाळू धोरण राबवलं जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे.
राज्यात वाळू माफियाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागला आहे. अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहने घातल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत, यावर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही मा.महसूल मंत्र्यांनी दिली.
1 thought on “राज्यात येणार नवीन वाळू धोरण: New Sand Policy In Maharashtra”