मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितील आज पंतप्रधान किसान निधीचे वितरण पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता बिहार राज्यातील भागलपूर येथील समारंभात वितरित करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितील आज पंतप्रधान किसान निधीचे वितरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारोहास नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. हा राज्यस्तरीय समारोह वनामती सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी कळविले आहे.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार रूपये प्रतिहप्ता प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी 6 हजार रूपये त्यांच्या आधारी संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येतात.
हे पण वाचा : hsrp number plate Maharashtra
पीएम किसान योजनेतंर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात यापूर्वी एकूण 18 हप्त्यात सुमारे 33 हजार 565 कोटींच लाभ जमा झालेला आहे.
1 thought on “मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितील आज पंतप्रधान किसान निधीचे वितरण”