Mini tractor घेण्याची शेतकऱ्यांना सर्वात मोठी संधी Mini tractor yojana

Mini tractor घेण्याची शेतकऱ्यांना सर्वात मोठी संधी Mini tractor yojana (मिनी ट्रॅक्टर योजना) विशेषतः बचत गटांसाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि ती सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अंतर्गत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल

मिनी ट्रॅक्टर योजना
मिनी ट्रॅक्टर योजना

 

Mini tractor घेण्याची शेतकऱ्यांना सर्वात मोठी संधी Mini tractor yojana

1.योजनेची माहिती मिळवणे: आपल्या स्थानिक पंचायत किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग कडून योजनेची माहिती मिळवा. तसेच, ऑनलाइन सुद्धा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर योजना आणि पात्रता संबंधित माहिती शोधा.

2. बचत गटाची नोंदणी: मिनी ट्रॅक्टर योजना लागू करण्यासाठी, तुमचं गट बचत गट म्हणून नोंदणीकृत असायला हवं. यासाठी गटाचे सर्व सदस्य सक्षम असावे आणि त्यांना योजना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

3. पात्रता निकष: या योजनेसाठी पात्रता निकष पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. उदा. गटाच्या सदस्यांची आर्थिक परिस्थिती, गटाची काम करण्याची क्षमता, इत्यादी.

4. अर्ज प्रक्रिया: संबंधित विभागाकडून अर्ज घेणे आणि त्यामध्ये आवश्यक दस्तऐवज जोडून संबंधित ठिकाणी सादर करणे.

5. सहाय्याची प्रमाणपत्र प्रक्रिया: अर्ज स्वीकारल्यानंतर, त्या अर्जावर विचार करून मिनी ट्रॅक्टर वितरित करण्यासाठी उपयुक्ततेचा निर्णय घेतला जातो.

6. फायदा घेणारा गट तयार करा: योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं बचत गट तयार करा आणि त्यासंबंधीच्या कागदपत्रांसह अर्ज भरा.

 

सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत पृष्ठावर किंवा तुमच्या जिल्ह्यातील कार्यालयात अधिक माहिती मिळू शकते.

हे पण वाचा : ट्रॅक्टरचे टायर मध्ये पाणी का भरतात? हा जुगाड बहुतेकांना माहीत नाही.

Mini tractor योजना राबविणे मागची उद्दिष्टे-:

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.

 

Mini tractor योजनेचे लाभाचे स्वरूप-:

बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु.3.१५ लाखांची आर्थिक मदत.

 

Mini tractor योजना अटी व शर्ती

• अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत

• स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८०% सदस्य हे अनुसूचित जाती वा नवबौद्ध घटकातील असावेत तसेच अध्यक्ष, सचिव, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत

• ट्रॅक्टर व त्याच्या उप्साधानांच्या खरेदीवर रु. 3.१५ लाख शासकीय अनुदान अनुञेय राहील.

• ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.

Mini tractor योजनेसाठी संपर्क

संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

 

Mini tractor योजनेसाठी अर्ज करण्याचे व लाभाचे मुख्य टप्पे

 1. ऑनलाईन अर्ज सदर करणे –

बचत गटाची व सदस्यांची संपूर्ण अचूक माहिती भरून अर्ज ऑनलाइन सादर करणे.

2.प्रिंट सादर करणे –

आपण सादर केलेला अर्ज वैध झाल्यास या अर्जाची सारांश प्रिंट सर्व सभासदांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून ऑनलाइन सादर करावी.

3.लाभार्थी निवड करणे-

वैध झालेल्या सर्व अर्जामधून चिठ्ठी च्या मदतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल .

 4. बिलाची पावती सादर करणे –

लाभार्थ्यांनी खरेदी केलेय साहित्याची व वाहनाची पावती ऑनलाइन सादर करणे. सादर केलेल्या पावतीवर विक्रेत्याचा GST क्रमांक, पावती क्रमांक, खरेदी दिनांक, वाहनाचा चेसीस क्रमांक, उप साधनांचे अनु क्रमांक, इत्यादी विस्तृत तपशील असणे गरजेचे आहे. मूळ (ओरीजनल) खरेदी पावती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.

 

5. वाहन परवाना सादर करणे –

लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या वाहनाचा RTO मार्फत मिळणारा वाहन परवाना ऑनलाइन सादर करणे. मूळ (ओरीजनल) वाहन परवाना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.

 

1 thought on “Mini tractor घेण्याची शेतकऱ्यांना सर्वात मोठी संधी Mini tractor yojana”

Leave a Comment